Pimpri-chinchwad : एमएनजीएलचे पेमेंट अपडेट करण्याच्या बहाण्याने 89 हजारांची फसवणूक

एमपीसी न्यूज –   एमएनजीएलचे पेमेंट अपडेट करण्याच्या बहाण्याने वृद्ध व्यक्तीला त्यांच्या मोबाईलवर एक अप्लीकेशन डाउनलोड करण्यास  सांगून वृद्ध व्यक्तीकडून ओटीपी क्रमांक घेऊन गुगलपे द्वारे  89  हजार 68 रुपये ट्रान्सफर करून फसवणूक केली. ही घटना मंगळवारी (दि. 2 एप्रिल)  रोजी पार्क स्ट्रीट सहकारी संस्था, वाकड (Pimpri-chinchwad) येथे घडली.

Pune: सचिन दांगट मित्र परिवाराच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी  जयंत कानगुडे (वय 77, रा. वाकड) यांना आरोपीने फोन  करून सांगितले की तुमचे एमएनजीएलचे पेमेंट आमच्या कंपनीच्या प्रणालीमध्ये      अद्ययावत होत नाही.  ते अद्ययावत करून घेण्यासाठी जयंत कानगुडे यांना आरोपीने एक अप्लीकेशन त्यांच्या मोबाईलवर  डाउनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर आरोपीने                  ट्रायल पेमेंट म्हणून १०० रुपये  फिर्यादीला पाठवण्यास सांगून त्यांच्याकडून ओटीपी क्रमांक घेऊन त्याआधारे कानगुडे यांच्या बँक खात्यातून 89 हजार 68 रुपये ट्रान्सफर करून घेत        आर्थिक फसवणूक केली.

फिर्यादी जयंत कानगुडे यांनी याप्रकरणी वाकड (Pimpri-chinchwad )पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार Sahid afridi 9050671918@paytm या पेटीएम बँक खाते धारकाच्या विरोधात वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, कोणत्याही अनोळखी व्यक्तींनी ओटीपी क्रमांक, एटीम क्रमांक, डेबिट किंवा क्रेडीट कार्ड चे खाते क्रमांक मागितले तर अजिबात देऊ नये असे वाकड पोलिसांनी (Pimpri-chinchwad) नागरिकांना आवाहन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.