Pune: सचिन दांगट मित्र परिवाराच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन 

एमपीसी न्यूज – सचिन दांगट मित्र परिवाराच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन (Pune)करण्यात आले होते. सालाबादप्रमाणे इफ्तार पार्टीचे नियोजनातुन वारजे परिसरातील हिंदु मुस्लीम एैक्य अबाधित राहिले पाहिजे आणि हा संदेश पुढील पिढीत जाऊन त्यांचा अंगीकार झाला पाहिजे या प्रामाणिक हेतुने सचिन दशरथ दांगट हा एक भाजपा कार्यकर्ता गेली काही वर्ष हे नियोजन करीत आहे.
संपूर्ण जगामध्ये हिंदू मुस्लिम बांधव एकत्र येऊन रमजानच्या पवित्र महिन्यातील (Pune)इफ्तार पार्टीचा सण साजरा केला जातो. मानवतेच्या भावनेतून सर्व धर्मीयांनी एकमेकांचे सण साजरे केल्याने समाजातील एकोपा वाढण्यास मदत होते. सर्व दरम्यान कडून असे सामाजिक उपक्रम राबविले जावेत यासाठी प्रयत्न व्हावेत कुठलाही अफवांवर विश्वास न ठेवता , समाजा समाजामध्ये तेढ निर्माण न होता सामाजिक सलोखा हा कायम जपला जावा, असे आमदार भीमराव तापकीर यांनी सांगितले.
काही विध्वंसक प्रवृत्ती त्यांच्या वैयक्तिक स्वार्थापोटी भाजपा हा पक्ष मुस्लीम विरोधी पक्ष असल्याचे चुकीचे चित्र समाजात पसरविण्याचे काम करीत आहे . हा गैरसमज दुर व्हावा आणि वारजे परिसरातील हिंदु मुस्लीम एैक्य अबाधित रहावे या प्रामाणिक हेतुने या इफ्तार पार्टीचे नियोजन करीत असल्याचे संयोजक सचिन दशरथ दांगट म्हणाले.
 जगातला कुठलाच धर्म वाईट वागण्यास, वाईट कृत्य करण्यास सांगत नाही. आपण सगळ्यांनी या गोष्टींचे अनुकरण केले पाहिजे, हे सांगत असताना वारजे परिसरातील अनेक स्थानिक प्रश्नांवर माजी ऊपमहापौर दिलीपभाऊ बराटे यांनी अभासपुर्ण उत्तरे दिली.

 

Hinjewadi: नसलेल्या सदनिकेचे दस्त करून 20 लाखांची फसवणूक

 

रमजानच्या पवित्र महिन्यातील उपवासाचे महत्व सांगत असताना काही विध्वंसक प्रवृत्ती समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करित असल्याचे नियोजन मंडळाचे सदस्य श्रीकृष्णदादा बराटे यांना सांगितले.  शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ यांनी समस्त वारजेकर हे सर्वधर्मसमभावाने एकत्र येऊन एकमेकांचे सण साजरे करण्यात धन्यता मानणारे असल्याचे सांगितले. पैंगबर शेख यांनी मुस्लीम समाजास येणारे काही अडचणींबाबत प्रकाश टाकला .
आजच्या इफ्तार पार्टीस खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर , माजी  उपमहापौर दिलीपभाऊ बराटे , वारजेगावचे माजी सरपंच श्रीकृष्ण बराटे , माजी शिक्षण मंडळ अध्यक्ष बाबा धुमाळ, माजी नगरसेवक दिलीप वेडे पाटील, किरण बारटक्के , स्वीकृत नगरसेवक संजय भोर , पैगंबर शेख आलम पठाण , हमीद शेख , अनवर शेख , रफिक शेख , अमजद अन्सारी , सुभाष अग्रवाल , अनिल भंडारी , ऋषिकेश रजावत , व्यंकटेश दांगट , चेकमेट टाइम्स चे धनराज माने , साद प्रतिसादचे राजीव पाटील,  दैनिक लोकमतचे सचिन सिंग , सलीम शेख , दैनिक पुढारीचे प्रदीप बलाढे यांच्यासह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संयोजन सचिन दांगट मित्र परिवाराच्या वतीने केले होते .
https://www.youtube.com/watch?v=nJw8J0rdB7U&ab_channel=MPCNews

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.