Pune : वीज दरवाढ मागे न घेतल्यास धरणे आंदोलन करण्याचा सुप्रिया सुळेंचा इशारा

एमपीसी न्यूज – वीज दरवाढ मागे न घेतल्यास धरणे आंदोलन करण्याचा इशारा  सुप्रिया सुळे यांनी  दिला. सामान्य जनतेला वीज दरवाढीचा “शॉक” दिल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतर्फे आंदोलन करण्यात आले. 
महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील सामान्य जनता आजपर्यंतच्या सर्वाधिक महागाईचा सामना करत आहे. अशा परिस्थितीत जनतेला महागाईच्या संकटातून दिलासा देण्यासाठी धोरण आखणे हे सरकारचं कर्तव्य असायला हवं. महाराष्ट्रातील ट्रिपल इंजिन सरकारने मात्र आधीच महागाईच्या चटक्यांनी पोळलेल्या जनतेला वीज दरवाढीचा शॉक दिला आहे अशा संतप्त भावना सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केल्या. विजेचा किमान स्थिर आकार तसेच प्रति युनिट वीज दर यात वाढ करून फडणवीस – पवार – शिंदे सरकारने एकूण वीज दरात सरासरी १५% वाढ केली आहे. सरकारने केलेल्या या वीज दरवाढीच्या निषेधार्थ महाविकास  आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गट, काँग्रेस, शिवसेना (उबाठा) गट आणि आम आदमी पार्टी यांच्या वतीने पॉवर हाऊस चौक, रास्ता पेठ येथे तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले.

 

Pimpri : राष्ट्रवादी काँग्रेसची पूर्ण ताकद खासदार बारणे यांच्या पाठीशी – अजित गव्हाणे

खासदार  सुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गट, रविंद्र धंगेकर (कॉंग्रेस), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष शेखर धावडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, शिवसेनेचे (उबाठा) गटाचे  शहराध्यक्ष संजय मोरे, आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष धनंजय बेनकर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी, अभय छाजेड, मुकुंद किर्दत, अशोक हरनावल, विशाल धनावड़े, कनव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत व महाविकास आघाडीच्या असंख्य कार्यकर्त्यांनी राज्यातील महायुती सरकारचा धिक्कार व्यक्त केला. “तिघाडी सरकारची मजा जनतेला दरवाढीची सजा, तिघाडी सरकारचा धिक्कार असो, महागाई जोमात जनता कोमात, जनतेच्या खिशाला कात्री हीच मोदींची गॅरंटी” अशा घोषणांनी संपूर्ण रास्ता पेठ परिसर दुमदुमला होता.
देशातील  गरीब, मध्यमवर्गीय  जनता अभूतपूर्व अशा महागाईचा सामना करत असून त्यांचे जीवन कठीण झालं आहे. अशा परिस्थितीत आपल्या राज्यातील जनतेला महागाईतून दिलासा देणं राज्य सरकारचं प्रथम कर्तव्य आहे. परंतू जनता खड्ड्यात गेली तरी चालेल, परंतू वीज उत्पादन करणाऱ्या अडाणी, अंबानी यांचे खिसे भरले पाहिजेत हेच या संविधानाचे पायमल्ली करून बसलेल्या सरकारचं धोरण आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत या सत्ताधाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय ही सुज्ञ जनता आता गप्प बसणार नाही असे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हटले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.