Pune : ललित पाटील प्रकरणात मी सगळं समोर आणत असल्याने माझ्यावर कारवाई; रविंद्र धंगेकर यांचा भाजपवर आरोप

एमपीसी न्यूज : आमदार रविंद्र धंगेकर (Pune) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, की  
काल माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेच्या कर्मचारी संघाने माझ्या विरोधात निषेध सभा घेतली आहे. मुळात इथं सभा घेता येत नाही, अस एक पत्र जिल्हा आधिकारी यांनी यापूर्वीच काढलं आहे. या आवारात महाराजांचा पुतळा आहे, म्हणून तिथं कुठल्याही राजकीय पक्षाला तिथं कुठलेच राजकीय कार्यक्रम घेता येत नाहीत.  त्या जागेत कुठलीही सभा, कुठलाही मोर्चा आणि आंदोलन त्या ठिकाणी घेता येत नाहीत. काल जे निषेध आंदोलन झालं हे चुकीचं झाल आहे, बेकायदेशीर आहे. 

महापालिका अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा त्यांनी  कुठलीही परवानगी घेतली नाही. काल झालेली नियमबाह्य सभा होती. पाण्याच्या टाकीच उद्घाटन करण्यासाठी सगळ्या पक्षाच्या नेत्याने बोलवण्याचा ठराव झाला होता. तरी अधिकारी जगताप यांनी परवानगी न घेता कार्यक्रम घेतला होता. भाजप आमदार यांच्या दबावाखाली येऊन कार्यकम घेतला, तो कार्यक्रम भाजपमय होता. आता अधिकारी भाजपमय झाले.

त्यांनी मला मुद्दाम अडवलं. आमच्या नेत्यांना मारहाण केली आहे. आधिकारी भाजपचे हस्तक झाले आहेत. हा पोलिसांचं जुना प्लॅन आहे.  गुन्हा दाखल करून मला मुद्दाम जेलमध्ये घालण्याचा प्रयत्न करत आहेत. आयुक्तांनी या कार्यक्रमाला परवानगी दिली. वेळ पडली तर त्यांचीही तक्रार मुख्यमंत्री महोदयांकडे करणार असल्याचे धंगेकर म्हणाले.

Pune : चौथा अंक’ रवींद्र महाजनी यांच्या पत्नी माधवी यांचे आत्मचरित्र प्रकाशित

ललित पाटील प्रकरणात मी सगळं समोर आणत (Pune) असल्याने माझ्यावर पोलीस कारवाई करत आहेत. माझ्याकडून जी शिवीगाळ झाली; तो कार्यकर्त्यांचा संताप आणि भावना होत्या. माझी वाढती लोकप्रियता आणि मी करत असणारे कामे बघून जाणूनबुजून माझ्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत. भाजपच्या आदेशाने माझ्यावर खोटे कलम लावत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 8 महिन्यापासून हे लोक मला अडचणी निर्माण करत असल्याचा आरोप धंगेकर यांनी भाजप पक्षावर केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.