Maharashtra : राज्यात आज तिस-या टप्प्यातील मतदानाला सुरुवात

 एमपीसी न्यूज-  महाराष्ट्र राज्यात लोकसभा निवडणूकीच्या तिस-या टप्प्यातील मतदानाला  आज सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे.  यामध्ये रायगड, बारामती, धाराशिव,  लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले अशा 11 मतदारसंघांचा समावेश आहे.

Maval LokSabha Election : निवडणूक खर्चात तफावत; श्रीरंग बारणे, संजोग वाघेरे यांना नोटीस

लातूरमधून कॉंग्रेसचे शिवाजी काळगे आणि भाजपचे सुधाकर शृंगारे, धाराशिवमधून ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर आणि राष्ट्रवादीच्या अर्चनाताई पाटील, सोलापुरात कॉंग्रेसच्या प्रणिती शिंदे आणि भाजपचे राम सातपुते, माढ्यात शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील आणि भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर, बारामतीत शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे आणि अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार यांच्यात,

साता-यात शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे आणि भाजपचे उदयनराजे भोसले यांच्यात, सांगलीत भाजपचे संजयकाका पाटील आणि ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील, कोल्हापुरात कॉंग्रेसचे छत्रपती शाहू महाराज आणि शिंदे गटाचे संजय मंडलिक, हातकणंगलेत शिंदे गटाचे धैर्यशील माने, स्वाभिमानीचे राजू शेट्टी आणि ठाकरे गटाचे सत्यजित पाटील यांच्यात तिरंगी, रायगडमध्ये अजित पवार गटाचे सुनील तटकरे आणि ठाकरे गटाचे अनंत गिते, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये भाजपचे नारायण राणे आणि ठाकरे गटाचे विनायक राऊत ( Maharashtra) यांच्यात लढत होणार आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.