LokSabha Elections 2024 : पीएमपीएमएलच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयात मतदान जागृती

एमपीसी न्यूज – पीएमपीएमएलच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयात ( LokSabha Elections 2024) मतदान जागृती करण्यात आली. परिवहन महामंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतली मतदान करण्याची प्रतिज्ञा केली.

लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून आपला सहभाग नोंदवावा यासाठी भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांनी मतदान जागृती कार्यक्रम घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यास अनुसरून पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत व सर्व डेपोंमध्ये 28 मार्च 2024 रोजी मतदान जागृती कार्यक्रमांतर्गत मतदान प्रतिज्ञा घेण्यात आली.

Nigdi : विनाकारण तरुणाला टोळक्याकडून मारहाण

परिवहन महामंडळाच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयात अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय कोलते, सहव्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा पोतदार-पवार यांच्यासह सर्व खातेप्रमुख, विभागप्रमुख व कर्मचाऱ्यांनी ( LokSabha Elections 2024) मतदानाचा हक्क बजाविण्याचा निर्धार व्यक्त करून मतदानाची प्रतिज्ञा घेतली. याप्रसंगी हवेली तालुका तहसीलदार सूर्यकांत येवले व कसबा विधानसभा मतदारसंघातील मतदान जागृती कार्यक्रमाची संपूर्ण टीम उपस्थित होती.

आपला मतदानाचा हक्क बजावून आपण सर्वांनी लोकशाहीच्या महोत्सवामध्ये सहभागी होऊया. तसेच आपले, मित्रमंडळी यांचे प्रबोधन करून जास्तीत जास्त मतदार मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवतील यासाठी प्रयत्न करूया. – डॉ. संजय कोलते, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.