Pimple Gurav : दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दुचाकी स्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – दुचाकी वरून घसरून पडून दुचाकीस्वाराचा ( Pimple Gurav) उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. हा अपघात 4 मार्च रोजी पिंपळे गुरव येथे घडला होता.
या अपघातात सचिन हरिभाऊ घंगाळे (वय 33 रा.जुनी सांगवी) यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी   सचिन धर्माजी ढवळे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

LokSabha Elections 2024 : पीएमपीएमएलच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयात मतदान जागृती

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन घंगाळे हे त्यांची दुचाकी वेगाने रस्त्याच्या परिस्थीतीकडे लक्ष न देता चालवत होते. यावेळी गाडी वेगात असल्याने ती पिंपळे गुरव येथे भगतसिंग चौकात घसरली. यामध्ये घंगाळे यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला . यावरून सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला  ( Pimple Gurav) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.