Pune Railway : उद्यान एक्सप्रेसमध्ये चढताना प्रवाशाचा सुटला तोल; सुरक्षा कर्मचाऱ्याने वाचवले प्राण

एमपीसी न्यूज – चालत्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्न करत (Pune Railway) असलेल्या एका प्रवाशाचा तोल गेला आणि प्रवासी रेल्वे व फलाटाच्या मध्ये पडला. हा प्रकार लक्षात येताच फलाटावर असलेल्या महाराष्ट्र सुरक्षा दलातील दिगंबर देसाई या कर्मचाऱ्याने प्रवाशाला बाहेर काढून त्याचा जीव वाचवला. ही घटना पुणे रेल्वे स्थानकावर फलाट क्रमांक तीनवर घडली.

याबाबत माहिती अशी की, उद्यान एक्सप्रेस (11301) पुणे रेल्वे स्थानकावर फलाट क्रमांक तीनवर आली. दुपारी 12.05 वाजता रेल्वे फलाटावरून सुटली. त्यावेळी एक प्रवासी घाईघाईने फलाटावर आला आणि चालत्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र रेल्वेचा वेग वाढला असल्याने त्यास रेल्वेत चढता आले नाही. त्यातच त्याचा तोल गेला आणि प्रवासी व्यक्ती रेल्वे आणि फलाट यांच्या मध्ये पडू लागला.

Pimple Gurav : दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दुचाकी स्वाराचा मृत्यू

त्याच वेळी तिथे उपस्थित असलेले दिगंबर देसाई यांनी क्षणाचाही (Pune Railway) विलंब न करता प्रवाशाच्या दिशेने धाव घेतली आणि त्याला ओढून बाहेर काढले. प्रवाशाला वेळीच बाहेर काढले नसते तर त्याचा जीव गेला असता. त्यानंतर रेल्वे थांबवण्यात आली. देसाई यांनी प्रवाशाला सुखरूप रेल्वेत बसवले आणि पुढील प्रवासासाठी पाठवून दिले.

दिगंबर देसाई यांच्या या कामगिरीचे रेल्वे विभागाकडून कौतुक केले जात आहे. तसेच धावत्या रेल्वेत कोणीही चढण्याचा अथवा उतरण्याचा प्रयत्न करू नये, असे रेल्वे विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.