Bhosari : बसमध्ये मोबाईल चोरला अन मोबाईलमधून बँक खाते केले रिकामे
एमपीसी न्यूज – बसमध्ये चढत असताना चोराने एका नागरिकाचा फोन चोरला ( Bhosari ) व त्याच फोनद्वारे नागरिकाच्या बँक खाते रिकामे केले. ही घटना मंगळवारी (दि.26) पीएमटी चौक भोसरी येथे घडली आहे.
याप्रकरणी संभाजी दगडू सावंत (वय 48 रा. भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून अज्ञात चोरावर गुन्हा दाखल केला आहे.
Pune Railway : उद्यान एक्सप्रेसमध्ये चढताना प्रवाशाचा सुटला तोल; सुरक्षा कर्मचाऱ्याने वाचवले प्राण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे बसमध्ये चढत असताना चोराने फिर्यादी यांचा 10 हजार रुपयांचा फोन चोरला. त्याच फोनद्वारे आरोपीने फिर्यादीच्या बँक खात्यातून 68 हजार 10 रुपये काढून घेतले. यावरून भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास ( Bhosari ) करत आहेत.