Arvind Kejriwal ED Case : अरविंद केजरीवाल यांना दिलासा मिळाला नाही; 1 एप्रिलपर्यंत ईडीच्या कोठडीत वाढ

एमपीसी न्यूज : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal ED Case) यांच्या रिमांड प्रकरणावरील सुनावणी पूर्ण झाली आहे. याप्रकरणी न्यायालयाने आपला निकाल दिला आहे. न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांच्या कोठडीत 1 एप्रिलपर्यंत वाढ केली आहे.

यापूर्वी कोर्टात ईडीने सांगितले की, दारू घोटाळ्यात 100 कोटी रुपयांची लाच मागितली गेली होती. एजन्सीकडे याचे सबळ पुरावे आहेत. दुसरीकडे, ईडी आम आदमी पार्टीला नष्ट करू इच्छित आहे, असा दावा केजरीवाल यांनी न्यायालयात केला. केजरीवाल कोर्टात म्हणाले की, 100 कोटींची लाच घेतली असेल तर पैसे कुठे गेले?

Bhosari : बसमध्ये मोबाईल चोरला अन मोबाईलमधून बँक खाते केले रिकामे

रिमांडची मागणी करताना ईडीने सांगितले की, मोबाईल फोनमधून डेटा काढण्यात (Arvind Kejriwal ED Case) आला असून त्याचे विश्लेषण केले जात आहे. मात्र, 21 मार्च रोजी अरविंद केजरीवाल यांच्या परिसरात झडतीदरम्यान जप्त करण्यात आलेल्या अन्य चार डिजिटल उपकरणांचा डेटा अद्याप काढण्यात आलेला नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.