Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांना  14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

एमपीसी न्यूज – दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना  14 दिवसांची न्यायालयीन कोठडी  ( Arvind Kejriwal )सुनावण्यात आली आहे. दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी  केजरीवाल यांना 21 मार्च रोजी ईडीने अटक केली होती  .  त्यानंतर त्यांना  28 मार्चपर्यंत त्यांना ईडी कोठडीत पाठवण्यात आलं होतं. त्यानंतर ईडीने पुन्हा कोठडी मागितली असता न्यायालयाने त्यांची ईडी कोठडी 1 एप्रिलपर्यंत वाढवली होती. आज न्यायालयाने केजरीवाल यांना 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यांना तिहार जेलमध्ये ठेवण्यात येणार आहे.

Railway Accident : रेल्वेतून पडल्याने दोघांचा मृत्यू

अरविंद केजरीवाल यांची 15 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर केजरीवाल यांनी जेलमध्ये तीन पुस्तके घेऊन जाण्यासाठी मागणी केली आहे.   भगवदगीता, रामायण आणि प्राईम मिनिस्टर डीसाईड ही तीन पुस्तके वाचण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी अर्ज केला आहे.  मात्र  न्यायालयाने अद्याप याबाबत परवानगी दिलेली ( Arvind Kejriwal ) नाही.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.