Akurdi :  सत्तामेव जयतेसाठी भाजपची लढाई – आदित्य ठाकरे

एमपीसी न्यूज – राज्यातील खोके महायुती सरकारकडून रांगोळी गुजरातला (Akurdi)आणि महाराष्ट्राची राख केली जात आहेत. मंत्री महिला खासदारांना शिव्या देत आहेत. गुंड मंत्रालयात जाऊन रिल्स करत आहेत. गुंड नेत्यांच्या मुलांना भेटत आहे, अशा सरकारकडून जनतेला न्याय मिळेल का? असा सवाल युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला. सत्तामेव जयतेसाठी भाजपची लढाई सुरु असल्याचा आरोपही त्यांनी केला.

आकुर्डीतील वज्रमूठ सभेत ठाकरे बोलत होते. भाजपकडून विरोधी पक्षातील नेत्यांवर (Akurdi)चिखलफेक केली जात आहे. चिखल फेकल्यानंतर भाजपमध्ये घेऊन धुवून काढत आहेत. अरविंद केजरीवाल यांनी भाजपसोबत येण्यास नकार दिल्याने त्यांना जेलमध्ये टाकले. सत्तामेव जयतेसाठी भाजप लढत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जेल की भाजप असा पर्याय दिला होता. त्यांचे पैशाचे गोडाऊन सापडले होते. आयकर विभागाच्या धाडी पडल्या होत्या.

 

Akurdi : 400 काय भाजप 200 दोनशे देखील पार करणार नाही – आदित्य ठाकरे

त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडे आले आणि भाजपसोबत जाऊ म्हटले. या वयात मी जेलमध्ये जाऊ शकत नाही म्हटले. अटकेच्या भीतीनेच शिंदे आणि 40 गद्दार भाजपसोबत गेले.

देशातील जनता महागाई, बेरोजगारीने त्रस्त आहे. शेतमालाला भाव नाही. शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळाली नाही. गॅस, पेट्रोल, डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. आंदोलक शेतकऱ्यांना रोखण्यासाठी भाजप सरकारने लाठीहल्ला केला. शेतकऱ्यांना खलिस्तानी म्हटले जाते, हे दुर्देव आहे. अशा सरकारला घरी बसविण्याची वेळ आल्याचेही ते म्हणाले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.