Maval LokSabha Elections 2024 : मावळमध्ये बारणे, वाघेरे यांच्यासह 10 जणांचे उमेदवारी अर्ज दाखल

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे, महाविकास आघाडीचे(Maval LokSabha Elections 2024) उमेदवार संजोग वाघेरे यांच्यासह 10 जणांनी आजपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल  केले आहेत.

मावळ लोकसभा मतदारसंघात आज (मंगळवारी) 6 उमेदवारांनी निवडणूक निर्णय (Maval LokSabha Elections 2024)अधिकारी दीपक सिंगला यांच्याकडे नामनिर्देशन पत्र दाखल दाखल केले आहेत. यामध्ये ज्योतीश्वर विष्णू भोसले (पनवेल, बळीराजा पक्ष), मुकेश मनोहर अगरवाल (कामशेत, अपक्ष), रफिक रशिद कुरेशी( पिंपरी, अपक्ष), प्रफुल्ल पंडीत भोसले ( पनवेल, अपक्ष), संजोग भिकू वाघेरे ( पिंपरी, शिवसेना उबाठा) आणि गोपाळ यशवंतराव तंतरपाळे( देहूरोड, अपक्ष) यांचा समावेश आहे.

Maval LokSabha Elections 2024 : पोटोबा महाराजांचे आशीर्वाद घेऊन बारणे यांच्या मावळातील प्रचाराचा शुभारंभ

तर, आज 3 व्यक्तींनी 9 अर्ज नेले आहेत. आजपर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करणा-या उमेदवारांची संख्या 10 आहे.  तसेच नेलेल्या उमेदवारी अर्जांची एकुण संख्या 134 आणि अर्ज नेणा-या व्यक्तींची संख्या 69 आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.