Morwadi : अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ इंडिया आघाडीची भाजप कार्यालयासमोर निदर्शने

एमपीसी न्यूज – कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी (Morwadi) ईडीकडून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना शुक्रवारी रात्री अटक करण्यात आली आहे. या अटकेच्या निषेधार्थ इंडिया आघाडीच्या वतीने पिंपरी, मोरवाडीतील भाजप कार्यालयासमोर निदर्शने केली.

ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गौतम चाबुकस्वार, आम आदमी पार्टीच्या शहराध्यक्षा मीना जावळे, पदवीधर आघाडीचे प्रदेशाध्यक्ष चेतन बेंद्रे, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, मानव कांबळे, बी.डी यादव, समाजवादी पक्षाचे रवी यादव आंदोलनात सहभागी झाले होते.

MPSC Exam : एमपीएससीची 28 एप्रिल आणि 19 मे रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलली

भाजप पक्ष घाबरला आहे. त्यामुळे ईडी, सीबीआयला पुढे केले जात आहे. देशाचे संविधान धोक्यात आले आहे. लोकशाही धोक्यात आहे. विरोधकांना तुरुंगात टाकले जात आहे. भाजप सरकारच्या विरोधात बोलणारा प्रत्येकाचा आवाज बंद केला (Morwadi) जात आहे. हे देशातील जनता पाहत आहे. भाजपला उत्तर देण्याची वेळ आली आहे. निवडणुकीत भाजपला पराभूत करावे, असे आवाहन आंदोलकांनी केले. केजरीवाल यांच्या अटकेचा तीव्र निषेध करण्यात आला. भाजप कार्यालयाचे मुख्य गेट बंद करण्यात आले. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.