Khed : कोयाळी येथे दारू भट्टीवर पोलिसांचा छापा

एमपीसी न्यूज – खेड तालुक्यातील (Khed) कोयाळी येथे सुरु असलेल्या एका दारू भट्टीवर आळंदी पोलिसांनी छापा मारला. यामध्ये एक लाखाचे रसायन पोलिसांनी नष्ट केले आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 21) सकाळी नऊ वाजताच्या सुमारास करण्यात आली.

भीवरेवाडी, कोयाळी येथील एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार योगेश्वर कोळेकर यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Morwadi : अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ इंडिया आघाडीची भाजप कार्यालयासमोर निदर्शने

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोयाळी गावातील भीवरेवाडी येथे एका महिलेने बेकायदेशीरपणे दारू भट्टी लावली असल्याची माहिती आळंदी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी गुरुवारी सकाळी 9 (Khed) वाजताच्या सुमारास कारवाई केली. त्यामध्ये एक लाख रुपये किमतीचे हात भट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन पोलिसांनी नष्ट केले. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.