Nigdi : त्रिवेणीनगरमध्ये पाईपालईन फुटली; यमुनानगर परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत

एमपीसी न्यूज – त्रिवेणीनगर चौक येथील पाण्याची मुख्य पाईपलाईन ( Nigdi) फुटल्याने सकाळपासून निगडीतील यमुनानगर भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. या भागात सकाळपासून पाणीपुरवठाच झाला नाही. त्यामुळे नागरिकांचे हाल झाले.

शहराला मागील साडेचार वर्षांपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. उन्हाळा वाढल्यामुळे पाण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे कमी दाबाने, अपुरा पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारीही सातत्याने वाढत आहेत. त्यातच त्रिवेणीनगर चौक येथी पाण्याची मुख्य पाईपलाईन फुटल्यामुळे पुरवठा बंद करावा लागला. टाकीवरुन पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्याने हजारो लीटर पाण्याची नासाडी झाली.

Air India Express : एअर इंडिया एक्सप्रेसच्या कर्मचाऱ्यांची सामूहिक वैद्यकीय रजा ; 82 उड्डाणे रद्द

या पाईपलाईनवरुन यमुनानगर भागाला पाणीपुरवठा केला जातो. यमुनानगरला सकाळचा पाणीपुरवठा असतो. एक वाजेपर्यंत पाणीपुरवठा केला जातो. परंतु, पाईपलाईन फुटल्याने सकाळी आठ वाजता या भागातील  पाणीपुरवठा बंद करण्यात आला. त्यामुळे यमुनानगरसह त्रिवेणीनगर भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. प्रेशर आल्याने पाईपलाईन फुटल्याची शक्यता व्यक्त करत दुरुस्तीचे काम सुरु आहे.  चार वाजेपर्यंत काम पूर्ण होईल. त्यानंतर यमुनानगर भागाला पाणीपुरवठा करण्यात येईल, असे  कार्यकारी अभियंता रामनाथ ( Nigdi) टकले यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.