Pune : पुण्याला सुखी शहर बनवूया – रवींद्र धंगेकर 

एमपीसी न्यूज – गेल्या 10 वर्षात पुण्याचे भाजपचे खासदार भाजपचे 6 आमदार व भाजपचे 100 नगरसेवक यांनी पुण्याचे ( Pune) नागरी प्रश्न सोडवत विकास केला असता तर पुण्यातील नागरी समस्या बिकट बनल्या नसत्या. सर्व समाज घटकांना सोबत घेऊन विकास करण्याची ताकद आणि इच्छाशक्ती असणाऱ्या काँग्रेस पक्षाला मतदान करून आपल्या पुण्याला ‘सुखी शहर’ बनवूया असे आवाहन महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार आ. रवींद्र धंगेकर यांनी केले. पर्वती विधानसभा मतदार संघातील पदयात्रेच्या सांगते वेळी ते बोलत होते.

 या पदयात्रेचे नागरिकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. ठिकठिकाणी धंगेकरांचे औक्षण केले जात होते तसेच पदायत्रेत सर्वांना पाणी दिले जात होते. अनेक सर्वाजीनिक मंडळांनी देखील धंगेकरांचे सत्कार केले काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व मित्रपक्षांचे पदाधिकारी व नेते मोठ्या संख्येने पदयात्रेत सहभागी होते तीनही पक्षांचे झेंडे डौलाने फडकत होते.

या पदयात्रेचा प्रारंभ मुकुंदनगर येथिल कचेरीचे उमेदवार आ. रवींद्र धंगेकर यांच्या हस्ते उद्घाटन करून झाला.

Maval LokSabha Elections 2024 : 3 उमेदवारी अर्ज बाद, 35 जणांचे पात्र

या पदयात्रेत रवींद्र धंगेकर यांच्या समवेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, माजी नगरसेवक अविनाश बागवे, माजी नगरसेविका स्नेहल पाडळे, पर्वती ब्लॉक अध्यक्ष संतोष पाटोळे,मार्केटयार्ड ब्लॉक अध्यक्ष रमेश सोनकांबळे, सतीश पवार, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सचिन तावरे, नितीन कदम, शशिकांत तापकीर, बाळासाहेब अटळ, महिला अध्यक्षा वाणीताई, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शिक्षण मंडळाचे सदस्य राजेंद्र शिळीमकर,

विभाग अध्यक्ष सुरज लोखंडे, संपर्क प्रमुख बाळासाहेब ओसवाल, युवा प्रमुख अमोल रासकर, वृक्ष संवर्धन समितीचे सदस्य द. स. पोळेकर, मागासवर्गीय माजी अध्यक्ष शीला रतनगिरी, आबनावे, आशुतोष शिंदे, भरत सुराणा, चंदू माने, अनुसया गायकवाड, शर्वरी गोतरणे, तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने ( Pune)   सहभागी झाले होते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.