Talegaon Dabhade: तळेगावात दाभाडे येथे उद्या भरणार पुणे जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील अजित गाडगीळ कॅरम असोसिएशनच्या (Talegaon Dabhade)वतीने पुणे जिल्हा मानांकन स्पर्धा शनिवार (दि.27) व रविवार (दि.28) रोजी पार पडणार आहे. पुरुष एकेरी महिला एकेरी आणि जेष्ठ नागरिक एकेरी या वर्गीकृत गटात ही स्पर्धा संपन्न होईल.

फ्रेंड्स ऑफ नेचरच्या निसर्ग अभ्यासिकेत होणाऱ्या या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय (Talegaon Dabhade)दर्जाचे खेळाडू अभिजीत त्रिपणकर, प्रकाश गायकवाड तसेच तीन वेळा विश्वविजेतेपद प्राप्त केलेले योगेश परदेशी यावेळी सहभागी होणार आहेत. अशी माहिती कॅरम असोसिएशन पुणेचे सेक्रेटरी सुदाम दाभाडे यांनी दिली.

Lok Sabha Election: लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात ;राज्यात 8 तर देशात 88 मतदारसंघात होणार मतदान

अजित गाडगीळ कॅरम अकॅडमी व क्लबच्या सहकारी सदस्यांच्या वतीने आयोजित या स्पर्धेत विजेत्या स्पर्धकाला रोख रक्कम 50 हजार व चषक प्रदान करण्यात येणार आहे. बक्षीस वितरण प्रसंगी विश्वविजेते सुहास कांबळे, हेमंत इनामदार, विनायक तोरणे व राजेंद्र शेट्टी यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तरी अधिकाधिक  संख्येने कॅरम प्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.