Pune : मेट्रोचे लोखंडी साहित्य चोरणाऱ्यांना अटक

एमपीसी न्यूज –  मेट्रोचे लोखंडी साहित्य चोरणाऱ्या चोरट्यांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक ( Pune) केली आहे.सागर रमेश वैरागळ (वय 27 ) आणि रवी दिलीप अडागळे (वय 29, दोघे रा. इंदिरानगर, गुलटेकडी) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. याबाबत एका तरुणाने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Today’s Horoscope 27 April 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर परिसरात हिंजवडी- शिवाजीनगर मेट्रो मार्गाचे काम सुरू आहे. त्यासाठी गणेशखिंड रस्त्यावरील हर्डीकर रुग्णालयासमोर लोखंडी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. गुरुवारी (दि. 25 ) मध्यरात्री आरोपी सागर आणि रवी लोखंडी साहित्य चोरून नेत होते. तेथून निघालेल्या तरुणाने मेट्रोचे साहित्य चोरणाऱ्या दोघांना पाहिले. त्याने त्वरित या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघांना अटक ( Pune) केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.