Baramati Loksabha Election : माण येथील मतदान केंद्रावर मतदान यंत्रात बिघाड

एमपीसी न्यूज – बारामती लोकसभा मतदारसंघासाठी (  Baramati Loksabha Election) मंगळवारी (दि. 7) मतदान पार पडले. मतदारसंघात मतदान शांततेत झाले. मात्र भोर विधानसभा मतदारसंघातील माण येथे मतदान यंत्रात बिघाड झाला. त्यामुळे एक तास मतदान बंद ठेवण्यात आले.

मंगळवारी झालेल्या मतदानात बारामती मतदार संघात 56.07 टक्के मतदान झाले. या निवडणुकीसाठी 38 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मध्ये बंद झाले. सन 2019 च्या निवडणुकीत बारामती मतदार संघात 61.7 टक्के मतदान झाले होते. यावर्षी हा मतदानाचा टक्का घसरला.

Maval : निवडणुकीसाठी मावळ मधून 49 बस

आयटी नगरी हिंजवडी बारामती मतदारसंघात येते. माण येथील बूथ क्रमांक 62 वर मतदान यंत्रात दुपारी दोन वाजताच्या सुमारास बिघाड झाला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर दुपारी दोन ते तीन वाजेपर्यंत मतदान बंद ठेवण्यात आले.

निवडणूक केंद्र प्रमुखांनी दुसरे मतदान यंत्र लावले आणि पुन्हा तासाभरानंतर मतदान सुरु झाले. बिघाड झालेल्या मतपेटीत बिघाड होईपर्यंत 472 जणांचे मतदान झाले होते. दुसरे यंत्र लावल्यानंतर बिघाड झालेल्या यंत्रातील मते राजकीय पक्षांच्या पोलिंग एजंटसमोर (  Baramati Loksabha Election) दुसऱ्या यंत्रात टाकण्यात आली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.