Pune-Amaravati Train : पुणे ते अमरावती दरम्यान आठवड्यातून दोन रेल्वे

एमपीसी न्यूज – पुणे-अमरावती दरम्यान (Pune-Amaravati Train) आठवड्यातून दोन गाड्या सोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. पुण्याहून अमरावतीसाठी शुक्रवारी आणि सोमवारी तर अमरावती येथून पुणेसाठी शनिवारी आणि सोमवारी रेल्वे सुटतील.

गाडी क्रमांक 11405 पुणे-अमरावती द्वि-साप्ताहिक एक्स्प्रेस 10 मार्च 2024 पासून दर शुक्रवारी आणि सोमवारी पुणे रेल्वे स्थानकावरून रात्री 10.45 वाजता सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी सायंकाळी 5.30 वाजता अमरावतीला पोहोचेल.

Pune : महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी 2024 – 25 या वर्षीचे 11 हजार 601 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक केले सादर

गाडी क्रमांक 11406 अमरावती-पुणे द्वि-साप्ताहिक एक्स्प्रेस अमरावती येथून 9 मार्च 2024 पासून दर शनिवारी आणि सोमवारी सायंकाळी 7.50 वाजता अमरावती रेल्वे स्थानकावरून सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी सायंकाळी 4.25 वाजता पुण्याला पोहोचेल.

दरम्यान ही गाडी उरुळी, केडगाव, दौंड जंक्शन, जिंती रोड, जेऊर, कुर्डुवाडी, (Pune-Amaravati Train) बार्शी टाउन, उस्मानाबाद, लातूर, लातूर रोड, परळी वैजनाथ, परभणी, पूर्णा, वसमत, हिंगोली डेक्कन, वाशीम, अकोला, मूर्तिजापूर आणि बडनेरा या स्थानकावर थांबेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.