Pimpri : फुफ्फुसात अडकला हळकुंडाचा तुकडा; डीपीयुमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया

एमपीसी न्यूज – एका 85 वर्षीय वृद्धाच्या फुफ्फुसात अडकेलला हळकुंडाचा तुकडा ( Pimpri) काढण्यात पिंपरी येथील डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या डॉक्टरांना यश आले आहे. वृद्धाला मागील तीन महिन्यांपासून सतत तीव्र खोकल्याचा त्रास होता. अनेक ठिकाणी उपचार घेऊनही निदान न झाल्याने वृद्धाला पिंपरीच्या डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. इथे डॉक्टरांनी निदान करून फुफ्फुसात अडकलेला हळकुंडाचा तुकडा शस्त्रक्रिया करून काढला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शेतकरी असलेल्या 85 वर्षीय व्यक्तीला तीन महिन्यांपासून सतत तीव्र खोकला सुरु झाला होता आणि उपचारासाठी त्यांनी विविध हॉस्पिटलना भेट दिली. याचा त्यांच्या दैनंदिन आयुष्यावर गंभीर परिणाम होऊ लागला आणि त्यामुळे त्यांना रात्री झोप येत नव्हती. या परिस्थितीत त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि उपचारासाठी लाखो रुपये खर्च केले. तरीही डॉक्टरांना मूळ आजाराचे निदान करता न आल्याने त्यांना या असह्य खोकल्याचा त्रास सुरूच राहिला. स्थिती गंभीर झाल्यानंतर पिंपरीच्या डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आल्यावर डॉक्टरांनी फुफ्फुसाचा सीटी स्कॅन करण्याचा सल्ला दिला आणि त्यामध्ये त्यांना रुग्णाच्या फुफ्फुसात काही बाहेरील वस्तू अडकली असल्याचे आढळून आले.

Chakan : साईड देण्याच्या कारणावरून पिकअप चालकाला मारहाण 

श्वसन विकार विभागाचे प्रमुख डॉ. एम. एस. बरथवाल यांच्या नेतृत्त्वाखाली त्यांच्या टीमच्या डॉक्टरांच्या पथकाने रुग्णाची ब्रॉन्कोस्कोपी केली. प्रक्रियेदरम्यान, असे आढळून आले की फुफ्फुसांमध्ये बाहेरील वस्तू अडकली असून त्याच्याभोवती पिवळ्या रंगाचे थर तयार झाले होते, ज्यामुळे ते काढणे कठीण झाले. चिमटा आणि विशेष साधनांचा वापर करून, वैद्यकीय पथकाने अत्यंत गुंतागुंतीच्या प्रयत्नानंतर व इजा न करता फुफ्फुसामध्ये अडकलेली बाहेरील वस्तू यशस्वीरीत्या काढली.

ती वस्तू कोणती असेल हे समजण्यास डॉक्टरांना सुरुवातीला वेळ लागला. मात्र ती वस्तू कापल्यानंतर, त्यांना त्याचा रंग पिवळसर असल्याचे आढळले. रुग्णाशी प्रक्रियेनंतरच्या संवादादरम्यान, त्याने खोकला कमी करण्यासाठी झोपण्यापूर्वी तोंडात हळकुंडाचा तुकडा ठेवल्याचे सांगितले. त्यावेळी डॉक्टरांनी असा निष्कर्ष काढला की हळकुंडाचा तुकडा झोपेच्या वेळी चुकून फुफ्फुसात शिरला असावा आणि अनावधानाने त्याच्या श्वासनलिकेत गेला असावा.

योग्य उपचारानंतर, वेदनादायक खोकल्याशी रुग्णाची प्रदीर्घ लढाई अखेर संपली असून काही दिवस डॉक्टरांच्या वैद्यकीय देखरेखीखाली ठेवल्या नंतर पूर्णपणे बरे झाल्यावर त्यांना घरी सोडण्यात आले.

Maval LokSabha Elections 2024 : आत्तापर्यंत मोदी कारकिर्दीचा ट्रेलर, यापुढे खरा चित्रपट – प्रशांत ठाकूर

 

श्वसन विकार विभागाचे प्रमुख डॉ. एम. एस. बरथवाल म्हणाले, “रुग्णाचा  खोकला बरा करण्याच्या प्रयत्नात बाहेरच्या डॉक्टरांनी केला तसेच रुग्णाला जी औषधे दिली गेली ज्यामुळे त्यांचा त्रास कमी झाला नाही. त्याचे योग्य निदान होऊ शकेल नाही. आम्हाला आनंद आहे की आम्ही रुग्णाचे योग्य मूल्यमापन करून त्वरित निदान करून या समस्येचे निराकरण करण्यात सक्षम झालो.

मागील वर्षी देखील, आम्ही एका रुग्णाच्या फुफ्फुसातून लवंगीचा देठ काढून टाकला होता, जो रुग्ण असह्य खोकल्यापासून आराम मिळाला. आजार कमी करण्यासाठी  हळदीचे तुकडे किंवा लवंगी देठ खोकल्यामध्ये सुधारण्यासाठी तोंडात ठेवले जाते पण अनवधानाने श्वसन नलिकेत गेल्याने रुग्णांना गंभीर स्थितीचा सामना करावा लागतो. आज आम्ही अशा रुग्णांच्या समस्येचे यशस्वीरित्या निराकरण करू शकलो, आमच्यासाठी ( Pimpri)  हा यशस्वी अनुभव रुग्णांसाठी जीवन बदलणारा ठरला आहे .”

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.