Nigdi : विनाकारण तरुणाला टोळक्याकडून मारहाण

एमपीसी न्यूज – एका 21 वर्षीय तरुणाला टोळक्याने लाथाबुक्क्यांनी व कोयत्याने ( Nigdi ) मारहाण केली आहे. ही घटना निगडीतील ओटास्कीम येथे मंगळवारी (दि.26) घडली आहे.
याप्रकरणी अली आदम शेख (वय 21 रा.निगडी) येथे घडली आहे. यावरून साहिल मुकरताल, अलताफ शेख, फैय्याज शेख, साहिल शेख, कालीम शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रोजाचा उफवास सोडून ओटास्कीम येथील फातिमा मस्जीत येथे थांबला होता. यावेळी आरोपी आले व त्यांनी विनाकारण शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी आरोपींनी फिर्यादीच्या पाठीत कोयत्याने मारहाण करत जखमी केले. यावरून निगडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, पोलीस पुढील तपास करत ( Nigdi ) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.