Pune: दिलीप वळसे पाटील यांचा अपघात; त्यांच्यावर होणार शस्त्रक्रिया

एमपीसी न्यूज : महाराष्ट्राचे (Pune) माजी गृहमंत्री, तसेच राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांचा घरात अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. त्यांचा पाय घसरून ते घरातच पडल्याची माहिती मिळाली आहे. वळसे पाटील यांच्या खुब्याला मार लागला असून त्यांचा हातही फ्रॅक्चर झाला आहे. 

वळसे पाटील यांच्यावर शस्त्रक्रिया होणार असून पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात वळसे पाटील यांना दाखल करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.