Chakan : गाडीचा हप्ता दिला नाही म्हणून मारहाण करत जीवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज – गाडीचा हप्ता दिला नाही म्हणून चार (Chakan) जणांनी एका व्यावसायिकाला हॉकी स्टीकने मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली. ही घटना सोमवारी (दि.25) चाकण येथे शिक्रापूर रोड येथील शेठ हॉटेल समोर घडली.

याप्रकरणी विकी मुरली राजपूत (वय 26 रा.भोसे,खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून प्रतिक जाधव, भोसल्या कुल्हाड, हर्षल तुंबडी, विनायक गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chikhali : तरुणाला कोयत्याचा दाखवून लुटणाऱ्या दोघांना अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी इको गाडीचा 20 हजार रुपयांचा हप्ता दिला नाही म्हणून आरोपींनी हप्ता दे असे सांगूनही हप्ता का दिला नाही म्हणून हॉकी स्टीकने मारहाण केली. तसेच हातातील तलवार (Chakan) दाखवून खल्लास करतो अशी धमकी दिली. यावरून चाकण पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.