Chikhali : तरुणाला कोयत्याचा दाखवून लुटणाऱ्या दोघांना अटक

एमपीसी न्यूज – तरुणाला रस्त्यात अडवून त्याला कोयत्याचा दाखवून लुटमार( Chikhali ) करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. ही घटना रविवारी चिखली स्पाईन रोड येथे भरदिवसा घडली होती.

 

याप्रकरणी चिखली पोलिसांनी प्रकाश उर्फ गणेश श्रीगोंडा (रा. काळेवाडी) व महादेव यांना अटक केली आहे. यावरून राजकुमार महादेव कल्याणी (वय 24 रा.मोशी) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

PCMC : सुट्टीच्या तीनही दिवशी सर्व कर संकलन कार्यालये रात्री 9 पर्यंत राहणार सुरू; 3 दिवसात 90 कोटींचे आव्हान

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व फिर्यादी हे तोंडओळखीचे आहेत. फिर्यादी पायी चालत जात असताना आरोपींनी आवाज देऊन त्यांना आडवले. त्यांच्याकडून 500 रुपयांची मागणी केली. यावेळी फिर्यादींनी पैसे मागितले. यावेळी आरोपींनी शिवीगाळ करत दमदाटी करण्यास सुरुवात केली. त्यांच्याकडील कोयता काढून फिर्यादीवर उगारला.

 

आरोपींनी जबरदस्ती खिशातून 900 रुपये काढले.फिर्यादीला वाचवण्यासाठी आसपासचे लोक आले असता त्यांनाही कोयत्याने धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली. दमदाटी करत आरोपी दुचाकीवरून पसार झाले होते. मात्र पोलिसांनी आरोपींना अटक करत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला ( Chikhali ) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.