Pune : पक्षाने आदेश दिल्यास आपण पुणे लोकसभा निवडणूक लढविणार – रमेश बागवे

एमपीसी न्यूज – पक्षाकडे मी काही उमेदवारी अर्ज (Pune) केला नाही. आपण इच्छुक असल्याचा दावाही केला नाही. मात्र, काँग्रेस पक्षाने आदेश दिल्यास आपण पुणे लोकसभा निवडणूक लढविणार असल्याची माहिती माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना दिली.

लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे. तसतशी इच्छुकांची संख्या वाढतच आहे. काँग्रेसतर्फे 20 जणांनी अर्ज भरले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने शहराध्यक्ष अरविंद शिंदे, आमदार रवींद्र धंगेकर, माजी आमदार मोहन जोशी, सरचिटणीस ऍड. अभय छाजेड, जेष्ठ नगरसेवक आबा बागुल, प्रवक्ते गोपाळ तिवारी प्रबळ दावेदार आहेत. पुण्यात जाहीर सभा घेऊन उमेदवार द्यावा, अशी मागणी बागुल यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना केली असताना, आता बागवे यांनीही पुणे लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये आणखी एका इच्छुकाची भर पडली आहे.

Chinchwad : शिक्षणाबरोबरच खेळाला ही महत्त्व द्या – डॉ. नीलकंठ चोपडे

कसबा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Pune) विजयी झाल्याने काँग्रेसचा आत्मविश्वास कमालीचा वाढला आहे. त्यामुळे इच्छुकांची संख्याही वाढली आहे. येत्या काही दिवसांतच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे. त्यामुळे काँग्रेस कोणाला संधी देणार, याची उत्सुकता लागली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.