Pimpri : शहरात विविध कार्यक्रमांनी महिला दिन साजरा

एमपीसी न्यूज – जागतिक महिला दिन (Pimpri) पिंपरी-चिंचवड शहरात विविध राजकीय पक्ष, संघटनांनी विविध कार्यक्रमांनी साजरा केला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) सामाजिक न्याय महिला विभागाच्या वतीने मध्यवर्ती पक्ष कार्यालय, खराळवाडी, पिंपरी येथे “जागतिक महिला दिन” निमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे व महिला अध्यक्षा प्रा. कविता आल्हाट यांच्या मार्गदर्शनात सामाजिक न्याय महिला विभागाच्या वतीने कर्तुत्ववान महिलांचा गौरव करून महिला दिन साजरा करण्यात आला.

पुनम अनंत अंभिरे यांनी अत्यंत गरिब परिस्थ‍ितीतून मेहनतीने मुलीचे शिक्षण पूर्ण करून तिला परभणी जिल्हा आरोग्य अधिकारी पदापर्यंत पोहचवून एक आदर्श माता म्हणून काम केले आहे. गवळण रोहिदास कांबळे यांनी आपल्या मुलाचे अत्यंत गरिब व हालाकीच्या परिस्थ‍ितीतून वकीलीचे शिक्षण पूर्ण करून त्यास सक्षम केले. ज्योती डोळस या सांस्कृतिक क्षेत्रात करित असलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल या महिलांचा सन्‍मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी ओबीसी विभागाचे अध्यक्ष विजय लोखंडे,महिला कार्याध्यक्ष कविता खराडे, महिला मुख्य संघटक पुष्पा शेळके, अर्बन सेल अध्यक्षा मनीषा गटकळ, बचत गट महासंघ अध्यक्ष ज्योती गोफणे, महिला उपाध्यक्ष आशा शिंदे या सर्व मान्यवरांनी महिलांसाठी सामाजिक, कला, क्रीडा क्षेत्रामध्ये असणाऱ्या विविध संधी व त्या संधीचा लाभ कसा घ्यावा याबाबत मार्गदर्शन करून माहिती दिली. सामाजिक न्याय महिला विभागाच्या वतीने सर्व महिला पदाधिकारी यांनी आज महिला दिनाचे औचित्य साधून मेट्रो सफारीचा आनंद देखील घेतला. कार्यक्रमास शहर कार्याध्यक्ष फजल शेख, साफसफाई कामगार अध्यक्षा सुवर्णा निकम, मेघा पळशीकर, वंदना कांबळे, आशा मराठे, वर्षा शेडगे, रतन जगताप, भारती काळभोर, रजनी गोसावी, सुवर्णा निकम, अनिता गायकवाड यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

शहर स्वच्छतेत महिला सफाई कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान महिला कर्मचाऱ्यांनी पिंपरी चिंचवड शहर स्वच्छ ठेवत मोठे योगदान आहे.त्यांच्या या कार्याची दखल घेऊन ‘जागतिक महिला दिनाचे’ औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून महिला सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी महिला सफाई कर्मचारी उपस्थित होत्या.

Pune : पक्षाने आदेश दिल्यास आपण पुणे लोकसभा निवडणूक लढविणार – रमेश बागवे

जागतिक महिला दिन अर्थात स्त्रीत्वाचा उत्सव साजरा करण्याचा दिवस. दरवर्षी 8 मार्च रोजी हा दिवस जगभरात साजरा केला जातो.हा दिवस खास महिलांच्या समान हक्कासाठी जागरुकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो. यादिवशी महिलांसाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. राजकारणापासून विज्ञान, कला, संस्कृती आणि इतरही विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान केला जातो. या दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी महिला सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान केला. यावेळी सचिन चिखले म्हणाले की, ‘महिला सफाई कर्मचार्‍यांमुळे पिंपरी चिंचवड शहर नेहमीच स्वच्छ व सुशोभित राहिले आहे. कोरोना महामारीच्या काळात, लॉकडाऊनमध्येसुध्दा त्यांनी अखंडितपणे आपले कार्य सुरु ठेवले होते. पुरुष कर्मचाऱ्यांसोबतच महिला कर्मचाऱ्यांनी ही आपले शहर स्वच्छ ठेवण्याचे सेवा कार्य नियमीत बजावले आहे. त्याबद्दल त्यांचे मानावेत तितके आभार कमीच आहेत. असे चिखले म्हणाले. यावेळी उपस्थित महिला सफाई कर्मचारी यांना खाऊ वाटप करुन महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

दरम्यान, सर्व महिला सफाई कर्मचार्‍यांच्या चेहर्‍यावर (Pimpri) आनंदाचे व समाधानाचे भाव दिसत होते. समाजात उपेक्षित असलेल्या आम्हा कामगारांना अशाप्रकारे आपुलकीने बोलावून मनसेने जो आमचा सन्मान केला तो खरंच खुपच कौतुकास्पद असल्याचे सांगून आमच्या सर्वांचे मनोधैर्य वाढल्याचे सर्व महिलांनी सांगितले. याप्रसंगी कैलास मांढरे, जयवंत दूधभाते, शुभम मोरे , आदी उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.