Pune : गुरुश्रींनी दिला विद्यार्थ्यांना अभ्यासाचा कानमंत्र

एमपीसी न्यूज – Study Techniques’ या विषयावर 2 मार्च रोजी ‘विद्यार्थ्यांसाठी एक सेशन (Pune) आयोजित करण्यात आले होते. यामध्ये गुरुश्रींचे बहुमूल्य मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले. भारतामधील विविध ठिकाणांहून तसेच भारताबाहेरील देशांमधून देखील अनेक शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींनी या सेशनचा लाभ घेतला.

‘अभ्यास कसा करायचा?’ हा प्रश्न विद्यार्थ्यांना नेहमीच पडतो. या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी गुरुश्रींनी विद्यार्थ्यांना चक्क अभ्यास करण्याची स्वतःची पद्धत निर्माण करायला शिकवली. यामध्ये अभ्यासाची प्रेरणा कशी उत्पन्न करायची, अभ्यासाची सुरुवात कशी करायची, कोणत्या वेळेस अभ्यास केला पाहिजे इथून ते अभ्यास करत नसताना च्या वेळीसुद्धा अभ्यास उत्तम व्हावा यासाठी काय व कशी काळजी घेतली पाहिजे याची माहिती गुरुश्रींनी दिली. यानंतर अभ्यास करताना एकाग्रता वाढवण्यासाठी गुरुश्रींनी विद्यार्थ्यांना एक अतिशय सोपे मेडिटेशन शिकवले व त्याचे प्रात्यक्षिक सुद्धा घेतले.

Pimpri : शहरात विविध कार्यक्रमांनी महिला दिन साजरा

‘गुरुश्रींनी शिकवलेल्या पद्धतीचा वापर करून अभ्यास केल्याने यापुढे अभ्यासाचे ओझे वाटणार नाही, अभ्यास करताना मजा येईल’ असा अभिप्राय विद्यार्थ्यांनी दिला. या पुढील सेशन हे ‘Nail the Interview – Part I’ या विषयावर (Pune) असून 4 मे 2024 रोजी होणार असल्याचे गुरुश्रीनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.