Shirur : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उमेदवारांकडे लक्ष

एमपीसी न्यूज – लोकसभा निवडणुकीची तयारी (Shirur) सध्या जोरात सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उमेदवारांकडे लक्ष लागले आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात डॉ. अमोल कोल्हे यांचा पराभव करणारच असल्याची खूणगाठ अजित पवार यांनी बांधली आहे. या मतदारसंघात शिवसेनेचे (शिंदे गट) शिवाजीराव आढळराव पाटील यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.

ही जागा राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) वाट्याला आहे. त्यामुळे या मतदारसंघात पार्थ पवार यांनी जोरदार जनसंपर्क वाढविण्यावर भर दिला आहे. तसेच, बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार कोणाला उमेदवारी देणार, याकडे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात दत्तात्रय भरणे यांना उमेदवारी मिळणार म्हणून कुजबुज सुरू आहे.

Mpsc : पिंपरी चिंचवडची पूजा वंजारी राज्यसेवा परीक्षेत राज्यात मुलींमध्ये प्रथम; पतीच्या साथीने उपजिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण

देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असतानाच महाराष्ट्रातील सर्वाधिक महत्त्वाची गणल्या जाणाऱ्या बारामतीकडे आता सर्वांचेच लक्ष आहे. कारण 2019 च्या तुलनेत (Shirur) मोठ्या प्रमाणावर बदललेली राजकीय समीकरणे, पवार कुटुंबातच पडलेली राजकीय फूट आणि लोकसभा मतदारसंघातील असमतोल परिस्थिती यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक फारच रंजक व राजकीयदृष्ट्या महत्त्वाची ठरणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे आणखी पक्ष मजबूत करण्याची जबाबदारी वाढली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना विजय मिळविणे वाटते तेवढे सोपे नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.