Pune : गद्दार आढळराव पाटलांना शिरूर लोकसभा मतदारसंघातून मतदार निवडून देणार नाहीत – प्रशांत जगताप

एमपीसी न्यूज – गद्दार आढळराव पाटलांना (Pune) शिरूर लोकसभा मतदारसंघातून मतदार निवडून देणार नाहीत. तर कर्तुत्ववान डॉक्टर अमोल कोल्हे पुन्हा खासदार होणार, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केला.

होय तेच शिवाजीराव आढळराव पाटील ज्यांनी अजितदादा पवार, दिलीप वळसे पाटील व राष्ट्रवादीच्या नेत्यांवर अतिशय खालच्या पातळीवर टीका केली, राष्ट्रवादी संपवण्याची भाषा केली. त्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियामध्ये उपलब्ध आहेत. त्यांनाच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देण्याची नामुष्की अजितदादा पवार यांच्यावर आली, मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस सक्षम असती तर आयात उमेदवार घेण्याची वेळच आली नसती, अशा शब्दात प्रशांत जगताप यांनी टीका केली.

Hinjawadi: भांडणे सोडवण्याचा प्रयत्न केला म्हणून तरुणाला बेदम मारहाण

शिवाजीराव आढळराव पाटील यांचा आज अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश (Pune) होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशांत जगताप यांनी आढळराव पाटलांसह अजित पवारांना देखील चिमटे काढले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.