Maval LokSabha Elections 2024 : वंचितच्या माधवी जोशी यांचा उमेदवारी अर्ज दाखल

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघासाठी वंचित बहुजन आघाडीच्या (Maval LokSabha Elections 2024)उमेदवार माधवी जोशी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

माधवी जोशी या रायगड जिल्ह्यातील माणगावच्या आहेत. त्या शरद पवार यांच्या(Maval LokSabha Elections 2024) राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होत्या. वर्षभरापासून त्यांची निवडणुकीची तयारी सुरु होती. जोरदार फलकबाजी केली होती. मात्र, महाविकास आघाडीत मावळची जागा ठाकरे गटाला सुटली.

 

त्यामुळे जोशी यांनी चार दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला. त्यांना तत्काळ उमेदवारी मिळाली. त्यानंतर जोशी यांनी  निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. महायुतीकडून खासदार श्रीरंग बारणे, महाविकास आघाडीकडून माजी महापौर संजोग वाघेरे आणि वंचितच्या माधवी जोशी यांच्या उमेदवारीमुळे तिरंगी लढत होणार आहे.

माधवी जोशी यांच्याकडे रोक रक्कम 45 हजार आहे. त्यांच्याकडे 93 लाखांची टोयाटो लॅन्ड क्रुझर ही मोटार, एक ट्रॅव्हलरआहे. विविध बँकांमध्ये ठेवी असून 45 लाखांचे सोने आहे.  त्यांची एक कोटी 58 लाख 42 हजार 768 रुपयांची जंगम मालमत्ता आहे.

 

तर, आंबीवलीत तीन ठिकाणी शेतजमीन, कर्जतमधील उमरोतील एक व्यावासायिक इमारत आहे. तर, पनवेलमध्ये एक इमारत आहे. अशी एक कोटी 97 लाख 70 हजारांची स्थावर मालमत्ता आहे.  त्यांची जंगम आणि स्थावर अशी एकूण तीन कोटी 51 लाख 12 हजार 768 रुपयांची मालमत्ता आहे. त्यांचे परिचारिकेचे शिक्षण झाले  आहे.

Pune: मनुष्य जीवन परोपकारासाठी समर्पित व्हावे – सदगुरु माता सुदीक्षा जी महाराज

पती, नरेश जोशी यांची 92 लाख 96 हजारांची 689 रुपयांची जंगम मालमत्ता आहे.  त्यात ट्रॅक्टर, ट्रॅव्हलर, वँगनगर, टोयाटा हायब्रीड मोटार आणि दोन दुचाकी आहेत. तर एक कोटी 12 लाख 50 हजार स्थावर मालमत्ता आहे. एकूण दोन कोटी पाच लाख 86 हजार 689 रुपयांची मालमत्ता आहे. जोशी कुटुबियांची एकूण मालमत्ता चार कोटी 56 लाख 99 हजार 457 रुपयांची मालमत्ता आहे. दोघांवर कोणतेही कर्ज नाही.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.