LokSabha Elections 2024 : निवडणूक – लोकशाहीचा उत्सव’ चित्रकला स्पर्धा

एमपीसी न्यूज – लोकसभा निवडणूक 2024 च्या निमित्ताने 36 (LokSabha Elections 2024) शिरूर लोकसभा मतदार संघा अंतर्गत 207 भोसरी विधानसभेच्या वतीने मतदार जनजागृती उपक्रम राबविण्यात येत असून त्या अनुषंगाने भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भोसरी येथे चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले व त्यामध्ये शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. निवडणूक – लोकशाहीचा उत्सव’ या विषयावर आधारित चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मतदार जनजागृती कार्यक्रम भोसरी विधानसभा 207 मार्फत सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी रेवणनाथ लबडे यांच्यासह तहसिलदार सतिश थेटे, शिक्षणाधिकारी संगिता घोडेकर / बांगर, नायब तहसिलदार अपर्णा देशपांडे, सहायक प्रशासन अधिकारी रजिया खान यांच्या मार्गदर्शनाखाली भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यामिक विद्यालय, भोसरी येथे ‘निवडणूक – लोकशाहीचा उत्सव’ (LokSabha Elections 2024) या विषयावर आधारित चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

Khed : कोयाळी येथे दारू भट्टीवर पोलिसांचा छापा

तसेच यावेळी उपस्थित पालकवर्गास / मतदारांस सहाय्यक नोडल अधिकारी अमोल फुंदे यांनी मतदानाचा पवित्र हक्क बजावण्याचे महत्त्व पटवून दिले. विनायक भुजबळ यांनी मतदार प्रतिज्ञा घेऊन तिचा आशय समजावून दिला. कार्यक्रम प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक प्राचार्य शेलार सर व सहकारी शिक्षक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.