Talegaon Dabhade : ‘इंद्रायणी’च्या विद्यार्थ्यांनी निराधारांसोबत साजरी केली होळी

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील पाथरगाव (Talegaon Dabhade) येथील एकता निराधार संघ या अनाथाश्रमामध्ये तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ‘होळी निराधारांची’ हा अनोखा उपक्रम राबवला. एकता निराधार संघातील सर्व मुलांना विविध प्रकारच्या फळांचे वाटप करण्यात आले.

जगण्याच्या खऱ्या रंगाला पारख्या झालेल्या अनेक निराधारांसोबत इंद्रायणी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी होळी साजरी करीत एक अनोखा सामाजिक संदेश दिला. इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांच्या मार्गदर्शनाखाली व सकाळ माध्यम समूहाच्या यिन क्लबच्या सहभागाने हा उपक्रम राबविण्यात आला.

तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालय व सकाळ माध्यम समूहाच्या यिन क्लब यांच्या वतीने ‘होळी निराधारांची’ हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. जगण्याच्या खऱ्या रंगाला पारख्या झालेल्या अनेक निराधारांसोबत इंद्रायणी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी होळी साजरी करीत एक अनोखा सामाजिक संदेश दिला आहे. इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांच्या मार्गदर्शनाखाली व सकाळ माध्यम समूहाच्या यिन क्लब च्या सहभागाने मावळ तालुक्यातील पाथरगाव येथील एकता निराधार संघ या अनाथाश्रमामध्ये हा उपक्रम संपन्न झाला.

LokSabha Elections 2024 : निवडणूक – लोकशाहीचा उत्सव’ चित्रकला स्पर्धा

एकता निराधार संघातील सर्व विद्यार्थी अतिशय आनंदाने या उपक्रमामध्ये सहभागी झाले होते.इंद्रायणी महाविद्यालयात नुकत्याच स्थापन झालेल्या सकाळ ‘यिन क्लब’च्या सर्व विद्यार्थी सदस्यांनी या वेगळ्या उपक्रमामध्ये सहभाग नोंदविला. यिन अध्यक्ष (Talegaon Dabhade) आदेश पोखरकर व उपाध्यक्ष प्रीती यंबतनाल यांनी इतर विद्यार्थी मित्रांच्या सहकार्याने या उपक्रमाचे आयोजन करीत इंद्रायणी महाविद्यालयाचे सामाजिक उत्तरदायित्व वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी इंद्रायणी महाविद्यालयाच्या वतीने एकता निराधार संघातील सर्व मुलांना विविध प्रकारच्या फळांचे वाटप या यावेळी करण्यात आले.

या कार्यक्रमास इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष व प्रसिद्ध उद्योजक रामदास काकडे व कार्यवाहक चंद्रकांत शेटे यांनी शुभेच्छा दिल्या. हा अनोखा उपक्रम राबविल्याबद्दल एकता निराधार संघाचे अध्यक्ष सागर रेड्डी यांनी इंद्रायणी विद्या मंदिर संस्था व सकाळ माध्यम समूहाचे आभार व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.