Khed : कोयाळी येथे दारू भट्टीवर पोलिसांचा छापा

एमपीसी न्यूज – खेड तालुक्यातील कोयाळी (Khed) येथे सुरु असलेल्या एका दारू भट्टीवर आळंदी पोलिसांनी छापा मारला. यामध्ये एक लाखाचे रसायन पोलिसांनी नष्ट केले आहे. ही कारवाई रविवारी (दि. 24) सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास करण्यात आली.

वंती देविदास गुडदावत (रा. भीवरेवाडी, कोयाळी, ता. खेड) हीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार विकास पालवे यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Akurdi : खान्देश मराठा पाटील संघातर्फे मयूर पाटील यांचा वास्तुविशारद हिरोजी इंदुलकर पुरस्काराने सन्मान

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोयाळी गावातील भीवरेवाडी येथे एकाने बेकायदेशीरपणे दारू भट्टी लावली असल्याची माहिती आळंदी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी रविवारी सायंकाळी सहा वाजताच्या (Khed) सुमारास कारवाई केली. त्यामध्ये एक लाख रुपये किमतीचे हात भट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन पोलिसांनी नष्ट केले. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी पळून गेल्याचे फिर्यादीत नमूद आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.