Pimple Saudagar : रहाटणी- पिंपळे सौदागर येथे प्राण‌प्रतिष्ठापणा सोहळ्याचे थेट प्रक्षेपण; विविध कार्यक्रमांचे आयोजन

एमपीसी न्यूज : आयोध्या राम नगरी येथे 22 जानेवारी 2024 रोजी श्रीराम जन्मभूमी मूर्ती प्राण‌प्रतिष्ठापणा सोहळा (Pimple Saudagar) आयोजित केला आहे, हा ऐतिहासिक सोहळा नागरिकांना पाहता यावा याचे साक्षीदार होता यावे त्या निमित्त रहाटणी पिपंळे सौदागर येथे नाना काटे सोशल फाऊंडेशन, उमेश काटे युथ फाऊंडेशन , सागर कोकणे युवा मंचचा वातीने विविध कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी 22 जानेवारी 2024 रोजी महादेव मंदिर पिंपळे सौदागर, श्री राम मंदिर रहाटणी येथे करण्यात आले आहे.

त्या अनुषंगाने आज रहाटणी येथील श्री राम मंदीर येथे मंदीर व परिसराची सामुदायिक पद्धतीने स्वच्छता करण्यात आली, तसेच यानंतर प्रभु श्री रामाची आरती देखील नाना काटे व इतर उपस्थित मान्यवराचा यांच्या हस्ते करण्यात आली.

सोमवारी होणाऱ्या भजन, कीर्तन, महाप्रसाद वाटप कार्यक्रमाचा तयारीचा आढावा देखील यावेळी घेण्यात आला. तसेच परिसरातील नागरिकांना हा सोहळा पाहता यावा (Pimple Saudagar) यासाठी रहाटणी राम मंदिर व महादेव मंदिर पिंपळे सौदागर येथे मोठ्या एलईडी स्क्रिन लावून आयोध्या श्रीराम जन्मभुमी येथे होण्याऱ्या प्रभू श्रीराम मूर्ती प्राण‌प्रतिष्ठापणा सोहळ्याचे थेठ प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

Shirur : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उमेदवारांकडे लक्ष

नाना काटे सोशल फाऊंडेशन व उमेश काटे युथ फाऊंडेशन च्या वतीने नागरिकांना देण्यात येणाऱ्या आयोध्या येथील राम मंदीराच्या प्रतिकृतीचे अनावरण व पुजन नाना काटे व उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आले याचे वाटप आज पासून घरोघरी जावून करण्यात येणार आहे. यावेळी आदेश राजवडे, चंद्रकांत तापकीर, उमेश काटे, सचिन काळे, अरूण तांबे, हरीश तापकीर, महादु कदम, महादेव कोकणे , गजानन तांबे, पप्पुशेठ पठारे, जिजाबा गोडांबे, शंकरराव नखाते, शिवाजी राजवडे, शिवाजी खुळे आदी मान्यवर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.