Pune : पुणे महापालिकेच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा – विक्रम कुमार

एमपीसी न्यूज – पुणे शहरात विविध वस्तू उत्पादीत (Pune) करणारे 6000 महिला बचत गट आहेत. पुणे महानगरपालिका समाज विकास विभागामार्फत राबविणेत येत असलेल्या विविध महिला सक्षमीकरण योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन पुणे महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार यांनी केले. पुणे महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पातील ठराविक रक्कम महिलांच्या सक्षमीकरणासाठी वापरणे बंधनकारक आहे. या योजनांचा लाभ सर्व महिला वर्गांनी घ्यावा. पुणे महानगरपालिकेमार्फत आयोजित करणेत येत असलेल्या विविध प्रशिक्षण उपक्रमाचा लाभ घेण्यास आयुक्तांनी सांगितले.

पुणे महानगरपालिका समाज विकास विभागामार्फत महिला बचत गट खाद्य महोत्सव प्रदर्शन व विक्रीचे आयोजन दि. 19/1/2024 ते दि. 21/1/2024 या कालावधी मध्ये करणेत आले आहे. या प्रदर्शनाचे उद्‌घाटन आज विक्रम कुमार यांच्या हस्ते पु. ल. देशपांडे उद्यान, सिंहगड रोड, पुणे येथे सपंन्न झाले. पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी महिला सक्षमीकरणअंतर्गत महिला बचत गटांकरीता येत्या काळामध्ये डिजिटल मार्केटींगचे नियोजन इ-कॉमर्स चे वेगवेगळे प्लॅटफॉर्म व मोबाईल ॲप्लिकेशन यांचे माध्यमातून करणेत येणार (Pune) असल्याचे नमूद केले.

Pimple Saudagar : रहाटणी- पिंपळे सौदागर येथे प्राण‌प्रतिष्ठापणा सोहळ्याचे थेट प्रक्षेपण; विविध कार्यक्रमांचे आयोजन

यामध्ये जास्ती जास्त लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले. या कार्यक्रमप्रसंगी परिमंडळ क्र. 3 चे उप आयुक्त श्रीमती आशा राऊत, उद्यान विभाग प्रमुख अशोक घोरपडे, सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयाचे महापालिका सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे, समाज विकास विभागाचे मुख्य समाज विकास अधिकारी रामदास चव्हाण, तसेच समाज विकास विभागाचे इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

उप आयुक्त नितिन उदास यांनी या कार्यक्रमाची प्रस्तावना केली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संदीप कोळपे यांनी केले. तर आभार प्रदर्शन रामदास चव्हाण यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.