Pimple Saudagar : न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये ‘जागतिक महिला दिन’ उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज – क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाउंडेशन (Pimple Saudagar) संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये ‘जागतिक महिला दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी माजी नगरसेविका निर्मला कुटे, समाज प्रबोधनकार महानंदा डाळिंबे, शिवसेना उपनेत्या अनिता तुतारे, सुनिता चाबुकस्वार,सामाजिक कार्यकर्त्या शोभाताई जगताप, संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, संदीप चाबुकस्वार, सामाजिक कार्यकर्ते तात्या शिंनगारे, शाळेच्या मुख्याध्यापिका नाजनीन शेख, उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत आदी उपस्थित होते.

Talegaon Dabhade : स्माईल व्यसनमुक्ती केंद्र या संस्थेचा तृतीय वर्धापन दिन सोहळा उत्साहात पार

प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धपुतळ्याचे, मा. जिजाऊ माॅंसाहेब, सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संस्थेतर्फे गेली दहा ते बारा वर्षांपासून महिलांची जनजागृती, सक्षमीकरण तसेच समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार होतो.

त्याद्वारे ‘सन्मान स्त्री शक्तीचा’ म्हणून समाजामध्ये विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिला डॉ.वर्षा जाधव, (आयसीयू असिस्टंट आदित्य बिर्ला हॉस्पिटल), डाॅ. सोनाली कटके, (सहाय्यक फिजिशियन, ज्युपिटर हॉस्पिटल), डॉ. लीना तुडयेकर (शाश्वत हॉस्पिटल औंध) ऍड.शुभांगी भालेराव, ऍड. सीमा शर्मा,,सी.ए.रूपाली घोलप शाळेच्या माजी मुख्याध्यापिका मोनिका सिंग,  कीर्तनकार प्रिया काटे, पत्रकार लीना माने, सामाजिक कार्यकर्त्या अश्विनी ताई तापकीर सुनिता पवार, सुजाता नखाते ,मंदा पगारे, विना कांबळे, कल्पना हालू, सोनाली जगताप, शोभा भालेराव, लायन्स क्लबच्या इंदू सूर्यवंशी आणि अंजुमन सय्यद तसेच शाळेच्या महिला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा संविधान प्रतिमा व गुलाब पुष्प देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .

महानंदा डाळिंबे यांचा एकपात्री “क्रांतीज्योती मी सावित्री बोलते” सावित्रीबाईंच्या जीवनावर समाज प्रबोधन (Pimple Saudagar) केले. सोनाली पाटील यांनी आपल्या भाषणातून मातृत्व हे परमेश्वराने स्त्रीला दिलेले एक अतुलनीय वरदान आहे,  असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता भालेराव व आभार रेणू राठी यांनी मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.