Baramati Loksabha election : माझ्यावर केलेले आरोप हे बिनबुडाचे असून निराधार आहेत – आमदार दत्तात्रय भरणे यांचे स्पष्टीकरण

एमपीसी न्यूज: बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर तालुक्याचे आमदार दत्ता भरणे यांचा आणि बारामती कार्यकर्ते अॅग्रोचे कर्मचारी यांच्यामधील शिवीगाळ प्रकरण सध्या सोशल मिडीयावर गाजत असताना दिसत आहे.याप्रकरणी इंदापूरचे आमदार आणि अजित पवार यांचे खंदेद समर्थक दत्ता भरणे यांनी माध्यमांना स्पष्टीकरण देत म्हटले आहे की,माझ्यावरील केलेले आरोप हे बिनबुडाचे असून निराधार आहेत आणि मला बदनाम करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून(Baramati Loksabha election) होत आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी आहे की,आज दि.(7 मे) रोजी बारामती लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघात मतदान होत आहे. इंदापूर तालुकादेखील बारामती लोकसभा मतदारसंघात येतो. इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे हे इंदापूर तालुक्यातील एका मतदार केंद्रावर फिरत असताना त्यांची तेथील काही लोकांबरोबर शिवीगाळ झाल्याचा व्हीडीओ व्हायरल होत असताना दिसून येत आहे.

Sharad Pawar : शरद पवार यांनी माळेगाव येथे केले मतदान

याबाबत स्पष्टीकरण देताना दत्तात्रय भरणे बोलताना म्हणाले की, “मी माझ्या मराठी भाषेत बोललो, पण मी शिवीगाळ अजिबात केलेली नाही. आज मतदान असल्यामुळे मी मतदान केंद्राजवळ फिरत होतो. तिथे कार्यकर्त्यांचं भांडण दिसलं. मी तिथे गेलो, त्यावेळी बारामती अॅग्रोचा कर्मचारी वेगळ्या भाषेत बोलत होता. त्यानं माझ्या विरोधातही काही शब्द वापरले.  व्हिडीओमध्ये तुम्ही पाहिलं असेलच, गावकरी त्याच्यावर धावून आले. जर मी तिथे नसतो तर अनर्थ घडला असता.  पैशाचे वाटप तो करत होता. माझा कोणताही राजकीय हेतू नव्हता, मी माझ्या बोलीभाषेत तेथील लोकांशी बोलत होतो.”

निवडणूक आयोगात दत्तात्रय भरणेंविरोधात कार्यकर्त्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.  त्यासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, “मी दबाव टाकत असेल, असं वाटत असेल तर व्हिडीओमध्ये जे लोक दिसत आहेत. त्यांचेही जबाब नोंदवा. त्यांना विचारा, तिथे पैशाचं वाटप आणि नोकऱ्यांचं आमिष कोण दाखवत होतं. निवडणूक आयोगातही मी हेच सांगीन. तक्रारीला कायदेशीर पद्धत्तीनं उत्तर देईन.”

” बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर तालुक्यात चांगल्या पद्धतीने सुनेत्रा पवार यांना मतदान होणार आहे. आज मतदान संपल्यानंतर येथील लोकांची विकासकामं, दुखलं खुपलं तर हे आम्हीच बघू. तो बारामती अॅग्रोचा कर्मचारी आहे. तो कार्यकर्ता नाही. काम करणारा माणूसच चिडतो. असं काही झालं असेल तर मी दिलगिरी पण व्यक्त करतो.”, असंही दत्तात्रय भरणे(Baramati Loksabha election) म्हणाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.