Wakad Crime : भिंतीला कलर मारल्याच्या कारणावरून एकाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – भिंतीला कलर का मारला असे विचारत तिघांनी मिळून एकाला बेदम मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 16) सकाळी साडेआठ वाजता गुजर नगर, थेरगाव येथे घडली.

संदीप धोंडू आंब्रे (वय 49, रा. गुजरनगर, थेरगाव) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी याबाबत मंगळवारी (दि. 17) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी राजेश चणाल (वय 50), दीपक चणाल (वय 25), विशाल (पूर्ण नाव माहिती नाही, सर्व रा. काळभोर नगर, आकुर्डी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास आरोपींनी फिर्यादी यांना ‘तुम्ही माझ्या घराच्या भिंतीला कलर का दिला’ असे विचारत शिवीगाळ व दमदाटी केली. त्यानंतर लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.