Wakad : पिस्तूल बाळगल्याप्रकरणी सराईत गुन्हेगारास अटक

एमपीसी न्यूज – पिस्तूल बाळगल्याप्रकरणी सराईत (Wakad) गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट एकने अटक केली. ही कारवाई गुरुवारी (दि. 28) रहाटणी येथे करण्यात आली.

सौरभ विकास साठे (वय 22, रा. रहाटणी) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.

Pune : लोकसभा निवडणुकसाठी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सोशल मिडियाच्या प्रमुखपदी गुलामहुसेन हमीद खान यांची निवड 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रहाटणी परिसरात गुन्हे शाखा युनिट एकचे पथक गस्त घालत असताना पोलिसांना माहिती मिळाली की, रहाटणी मधील एका सोसायटी जवळ एक व्यक्ती थांबला असून त्याच्याकडे पिस्तूल आहे. (Wakad) त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून सौरभ साठे याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांची चाहूल लागताच तो पळून जाऊ लागला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे. आरोपी सौरभ साठे याच्या विरोधात यापूर्वी खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.