Pune : चांगला नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एकाची 15 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – डिजिटल गुंतवणुकीवर चांगला नफा मिळवून देण्याच्या ( Pune ) आमिषाने सायबर चोरट्यांनी एका व्यक्तीला 15 लाखांना गंडा घातला. याबाबत चतु:शृंगी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Pune : लोकसभा निवडणुकसाठी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सोशल मिडियाच्या प्रमुखपदी गुलामहुसेन हमीद खान यांची निवड 
याप्रकरणी सुतारवाडी पाषाण भागातील एका 47 वर्षीय व्यक्तीने चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.चोरट्यांनी तक्रारदारास डिजिटल गुंतवणूक करून नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. आरोपींनी एक व्हॉट्‌सॲप ग्रुप तयार केला. त्यानंतर तक्रारदाराच्या मोबाईलवर लिंक पाठवली. त्यानुसार तक्रारदार व्यक्तीने जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये 15 लाख 34 हजार रुपयांची गुंतवणूक केली.

परंतु चोरट्यांनी तक्रारदारास मुद्दल आणि नफ्याची रक्कम परत दिली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी संबंधित मोबाईल क्रमांकाच्या वापरकर्त्यांवर आणि व्हॉट्‌सॲप ग्रुपच्या ॲडमिनविरुद्ध गुन्हा दाखल ( Pune ) केला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.