Google : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुगलची मोठी कारवाई; 1.2 कोटी Google खाती केली ब्लॉक

एमपीसी न्यूज : गुगलने जाहिराती दाखवण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यांवर कडक कारवाई केली आहे. Google च्या जाहिरात धोरणाचे उल्लंघन करून वापरकर्त्यांना त्यांच्या जाहिराती दाखवत असलेली सुमारे 1.2 कोटी Google खाती Google ने ब्लॉक केली आहेत. गुगलचे म्हणणे आहे की, नियमांचे उल्लंघन केल्यामुळे मालवेअर आणि फसवणुकीत वाढ झाल्याची माहिती समोर आली होती. तपासणीनंतर जी गुगल खाती नियमांना बगल देऊन जाहिराती देत ​​होत्या ते काढून टाकण्यात आले आहेत. गुगलने आपल्या वार्षिक जाहिरात सुरक्षा अहवालाचा हवाला देत ही माहिती प्रसिद्ध केली आहे.

Pune : चांगला नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एकाची 15 लाखांची फसवणूक

युजर्सची गोपनीयता आणि सुरक्षिततेशी तडजोड केली जाणार नाही, असे गुगलचे म्हणणे आहे. घोटाळ्याच्या जाहिरातींविरुद्ध गुगलचा लढा सुरूच राहील. जाहिराती दाखवण्याच्या नावाखाली डीपफेकसारखे नवनवीन डावपेच वापरून वापरकर्त्यांची फसवणूक केली जात असल्याचे गगूल सांगतात. काही काळापूर्वी सचिन तेंडुलकरचा डीपफेक व्हिडिओ बनवून एक जाहिरात करण्यात आली होती, ज्याबाबत गुगल सतर्क झाले आहे. अशीच भीती लोकसभा निवडणुकीबाबत व्यक्त केली जात आहे, जिथे डीपफेकचा गैरवापर होऊ शकतो.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.