Alandi : आळंदीमध्ये ‘ एक गाव एक शिवजयंती ‘ मोठ्या उत्साहात साजरी

एमपीसी न्यूज – आज ( दि.28 रोजी)  आळंदी येथे ‘ एक गाव एक शिवजयंती’ चे आयोजन समस्त ग्रामस्थांच्या ( Alandi ) वतीने करण्यात आले होते. शिवजयंतीनिमित्त नगरपरिषदेजवळील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक आकर्षकरित्या फुलांनी सजवण्यात आले होते. शिव स्मारक येथे पालिकेतर्फे  केलेल्या सुशोभीकरणाच्या कामामुळे तेथील सौंदर्यात आणखी भर पडली आहे. 

Google : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुगलची मोठी कारवाई; 1.2 कोटी Google खाती केली ब्लॉक

 

 सकाळी तुळापूर येथून शिवज्योतीचे आगमन  झाल्यानंतर  पालिका आधिकारी , कर्मचारी व आळंदीतील ग्रामस्थ यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून  विनम्र अभिवादन करण्यात आले. सायंकाळी   ग्रामस्थांच्या वतीने  ढोल ताश्याच्या गजरात , बँडच्या वाद्यात, फटक्यांच्या आतिषबाजीत आदियोगी शिवभक्ती रथात छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मिरवणूक काढण्यात आली.  या मिरवणुकीत घोडे ,बैलगाडीचे आयोजन करण्यात आले होते.   यावेळी मोठ्या प्रमाणात शिवभक्त उपस्थित ( Alandi)  होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.