Alandi:पहिले पाऊल अंतर्गत पालक मेळावा संपन्न

एमपीसी न्यूज – श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिर आळंदी देवाची प्रशालेत विद्यार्थ्यांची (Alandi)सर्वांगीण प्रगती व्हावी यासाठी विविध उपक्रम घेतले जातात.शासनाच्या धोरणानुसार विद्यार्थी इयत्ता पहिलीत दाखल होत असताना त्याच्या मूळ क्षमता विकसित होण्यासाठी पहिले पाऊल अंतर्गत पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
 श्री ज्ञानेश्वर बालक मंदिरातील इयत्ता पाहिलीतील प्रवेश पात्र विद्यार्थी,पालक,संस्थेचे सचिव अजित वडगावकर,शिक्षक  (Alandi) मेळाव्यासाठी उपस्थित होते.प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.अजित वडगावकर यांनी मराठी माध्यमाच्या शाळांचे महत्व सांगून संस्था,शाळा विद्यार्थी हाच केंद्र बिंदू मानून त्याच्या सर्वांगीण विकासाकरिता आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देत असते.तसेच पहिले पाऊल या उपक्रमातर्गत पालकांनी पाल्यास पुढील दोन महिन्यात सक्षम करावे. असे शुभेच्छा पर मनोगत व्यक्त केले.

 मुख्याध्यापक प्रदीप काळे यांनी मेळाव्याचा उद्देश सांगून सुट्टीच्या कालावधीत पालकांनी विद्यार्थ्यांकडून दररोज घर,परिसरातील उपलब्ध साधनाचा वापर करून विद्यार्थ्याच्या क्षमता कशा विकसित कराव्यात याचे मार्गदर्शन केले.निशा कांबळे यांनी शाळेतले पहिले पाऊल पुस्तकात करावयाच्या उपक्रम,कृती याविषयी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले.पालकांच्या सूचनेचे,समस्यांचे निराकरण करण्यात आले.

 

   प्रदीप काळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. मेळावा संपन्न करण्यासाठी शिक्षकांचे सहकार्य लाभले.पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.