Nigdi : व्यक्तींचा सन्मान म्हणजे राष्ट्राचा ही गौरव – गिरीश प्रभुणे

एमपीसी न्यूज – आज आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य (Nigdi)करणाऱ्या व्यक्तींचा ग्लोबल गांधीयन मानद डॉक्टरेट प्रदान करून गौरविण्यात येत आहे. हा अभिमानाचा क्षण असून डॉक्टरेट मिळविलेल्या व्यक्तींबरोबरच समाजाचा आणि राष्ट्राचा ही गौरव आहे.

 

गांधी पीस फाऊंडेशन नेपाळ, कर्तव्य फाऊंडेशन यांनी विविध क्षेत्रातील (Nigdi)कर्तव्यदक्ष व्यक्तींचा गौरव करून समाजाला नवी दिशा दिली आहे; हे कौतुकास्पद आहे, असे मत ज्येष्ठ समाजसेवक गिरीश प्रभुणे यांनी व्यक्त केले.

Maval LokSabha Elections 2024 :  मावळ लोकसभेसाठी 3 दिवसात 49 व्यक्तींनी नेले 92 उमेदवारी अर्ज;खासदार श्रीरंग बारणे यांनीही घेतला अर्ज    

गांधी पीस फाऊंडेशन नेपाळ, कर्तव्य फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सहावा ग्लोबल गांधीयन फिलॉसॉफी मानद डॉक्टरेट प्रदान सोहळा निगडीतील ग. दि. माडगूळकर सभागृहात आज (शनिवारी) पार पडला. या कार्यक्रमात सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे मॅक्सवेल्स ग्रुपचे संचालक मनोज कदम यांनी मनुष्यबळ आणि कौशल्य विकासाव्दारे अनेकांना रोजगार संधी उपलब्ध करून दिल्या याबद्दल तर सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राजेंद्रसिंह वालिया, ज्येष्ठ पत्रकार डॉ. महेंद्र देशपांडे यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली.

यावेळी गांधी पीस फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. लाल बहादूर राणा, डॉ. सुनीलसिंह पुरणसिंह परदेशी, कर्तव्य फाऊंडेशनचे डॉ. विरेंद्र सिंह टिळे, डॉ. राजेंद्र आहेर, डॉ. महेंद्र देशपांडे, गांधी पीस फाऊंडेशनच्या आंतरराष्ट्रीय राजदूत डॉ. आशा पाटील, डॉ. श्वेता चौगुले आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. लाल बहादूर राणा, डॉ. महेंद्र देशपांडे, डॉ. आशा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ. सुनीलसिंह परदेशी यांनी केले. आभार डॉ. विरेंद्रसिंह टिळे यांनी मानले.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.