Maval LokSabha Elections 2024 :  मावळ लोकसभेसाठी 3 दिवसात 49 व्यक्तींनी नेले 92 उमेदवारी अर्ज;खासदार श्रीरंग बारणे यांनीही घेतला अर्ज    

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघ (Maval LokSabha Elections 2024)निवडणुकीसाठी आज (शनिवारी) 10 व्यक्तींनी आकुर्डी येथील मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून 22 नामनिर्देशन पत्र नेले आहेत. आजपर्यंत एकुण 49 व्यक्तींनी एकुण 92 नामनिर्देशन पत्रे नेली आहेत. महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनीही अर्ज घेतला आहे.                        

आज नामनिर्देशन पत्रे घेणाऱ्या व्यक्तींची नावे व त्यांनी (Maval LokSabha Elections 2024)नोंदविलेल्या माहितीचा  तपशील
Pimple Saudagar : भारताच्या विकासाची गती कायम ठेवण्यासाठी मोदी पुन्हा पंतप्रधान होणे आवश्यक – बारणे
श्रीरंग चंदू बारणे (थेरगाव, शिवसेना), सुहास मनोहर राणे (लोणावळा,अपक्ष), शेखर पांडुरंग चंदनशिवे (पिंपरी , राष्ट्रवादी युवक कॉग्रेस), ॲड.राजू पाटील (वाकड , अपक्ष), ॲड.पूजा कलाटे (वाकड , अपक्ष),  विजय निवृत्ती वाघमारे (वाकड, बहुजन समाज पार्टी), सागर तुकाराम जगताप (पिंपळे सौदागर, बहुजन समाज पार्टी), भाऊ रामचंद्र अडागळे (निगडी, महाराष्ट्र मजुर पक्ष), किशोर वसंत साळवे (गणेश नगर, अपक्ष), उत्तम संभाजी कांबळे (पिंपरी, अपक्ष) तसेच शिवाजी किसन जाधव (थेरगाव, भारत राष्ट्र समिती) यांनी देखील नामनिर्देशन पत्र नेले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.