Today’s Horoscope 29 March 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज –  Today’s Horoscope 29 March 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग

आजचा दिवस – शुक्रवार

तारीख – 29.03.2024.

शुभाशुभ विचार- विशाखा वर्ज्य.

आज विशेष – गुड फ्रायडे.

राहू काळ – दुपारी 10.30 ते 12.00.

दिशा शूल – पश्चिमेस असेल.

आज नक्षत्र – विशाखा 20.36 पर्यंत नंतर अनुराधा. 

चंद्र राशी – तुळ 14.09 पर्यंत नंतर वृश्चिक.

—————————–

मेष  ( शुभ रंग- भगवा)

कार्यक्षेत्रात महत्त्वाची कामे दुपार पूर्वीच उरकून घ्यायला हवीत. आज झटपट लाभाचा मोह टाळायला हवा. वैवाहिक जीवनात जोडीदाराला फार प्रश्न विचारू नका.

वृषभ (शुभ रंग- पिस्ता)

सगळी महत्त्वाची कामे आज दिवसाच्या पूर्वार्धातच करा. व्यावसायिकांनी स्पर्धकांना कमजोर समजू नये. भागीदारीत देण्याघेण्याचे व्यवहार चोख असलेले बरे.

मिथुन (शुभ रंग – लाल)

नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांच्या मर्जीत राहाल. तब्येत थोडी नरमच राहील. येणी मागितल्यास वसूल होतील. वैवाहिक जीवनात तिसऱ्या व्यक्तीचा विषयच नको.

कर्क ( शुभ रंग- लाल)

तुमच्या प्रामाणिक मेहनतीस आज दैवाची उत्तम साथ मिळेल. दुपारनंतर काही बिकट प्रश्न सहजच सुटतील. असाध्य आजारावर डॉक्टरांना अचूक उपाय सापडेल.

सिंह ( शुभ रंग- मोतिया)

आज व्यापार उद्योगाला चांगली गती येईल. महत्त्वाच्या चर्चेत आपल्या मतावर तुम्ही ठाम राहाल. स्थावराची खरेदी विक्री फायद्यात राहील. घर सजावटीस प्राधान्य द्याल.

कन्या (शुभ रंग- सोनेरी)

नवीन व्यवसायात मर्यादा ओळखून आर्थिक उलाढाली केलेल्या बऱ्या. अति आत्मविश्वास ही आज नुकसानाला कारणीभूत ठरेल. आज रागावर नियंत्रण गरजेचे आहे.

तूळ (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

आर्थिक व्यवहारात सावध असणे गरजेचे आहे. आज अनावश्यक खर्च टाळा. दिवसाच्या उत्तरार्धात एखादा मोठा खर्च उद्भवेल. वृद्धांनी तळपायाची काळजी घ्यावी.

वृश्चिक ( शुभ रंग- चंदेरी)

नोकरीच्या ठिकाणी काही मनाजोगत्या घटना घडतील. सहकारी तुमच्या मताचा आदरच करतील. अधिकारांचा गैरवापर मात्र टाळा. वाहतुकीचे नियम पाळायला हवेत.

धनु (शुभरंग- गुलाबी)

आजचा दिवस उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने तितकासा अनुकूल नाही. मोठे आर्थिक व्यवहार उद्यावरच ढकला. आज जेष्ठ मंडळी तीर्थक्षेत्री पर्यटन करतील.

मकर (शुभ रंग-हिरवा )

नोकरीच्या ठिकाणी पदोन्नतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील. अधिकार योग चालून येतील. सकारात्मक दृष्टिकोन बाळगा. आज मोठा भाऊ तुम्हाला योग्य सल्ले देईल.

कुंभ ( शुभरंग- आकाशी)

आज तुम्ही फक्त आपल्या कर्तव्याला प्राधान्य देणार आहात. इतरांच्या कामासाठी आपल्या अधिकारांचा वापर कराल. रखडलेली शासकीय कामे गती घेतील.

मीन (शुभ रंग- निळा)

कार्यक्षेत्रात डोक्याला ताप देणाऱ्या काही घटना घडतील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ जितके विचारतील तितकेच बोला. आज आईच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी.

 शुभम भवतु
श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार 
9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.