Pune : चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून महिलेची 11 लाख रुपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज  –   चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून एका महिलेची 11 लाख रुपयांची ( Pune) फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत एका 34  वर्षीय महिलेने वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी तक्रारदार महिलेस मोबाइलवर संपर्क साधला. ऑनलाइन पोर्टलवर जाहिरातींना दर्शकांची पसंती मिळवून दिल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवले.

Today’s Horoscope 29 March 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

त्यानुसार महिलेने ऑनलाइन काम केल्यानंतर चोरट्यांनी त्यांना परतावा दिला. महिलेचा विश्‍वास संपादन केला. त्यानंतर ऑनलाइन टास्क व्यवसायात जादा रक्कम गुंतवणूक करण्यास सांगितले. चोरट्यांनी महिलेकडून मागील सहा महिन्यांत 11 लाख 13  हजार रुपये खात्यात भरण्यास भाग पाडले. परंतु महिलेला परतावा दिला नाही. याबाबत महिलेने पोलिस ठाण्यात फिर्याद ( Pune)  दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.