Pune : रेस्टॉरंट, हॉटेल्स आणि आइस्क्रीम पार्लर रात्री दीडपर्यंत चालू ठेवण्यास परवानगी

एमपीसी न्यूज – पब, बिअर बार पाठोपाठ (Pune) आता रेस्टॉरंट, हॉटेल्स आणि आइस्क्रीम पार्लर हे देखील रात्री दीडपर्यंत चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र रस्त्यावरचे  खाद्य पदार्थांचे स्टॉल्स  रात्री साडेअकरानंतर बंद ठेवण्याचे आदेश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. कारण देशी दारूच्या दुकानांना सकाळी आठ ते रात्री दहा वाजेपर्यंत वेळ आहे.  दारूच्या दुकानाजवळ अंडाभुर्जी, चायनीज खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर मद्यपी दारू पितात. त्यामुळे  वेळेचे पालन न केल्यास अशा अंडाभुर्जी, चायनीज खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर कारवाई करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

Pune : चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून महिलेची 11 लाख रुपयांची फसवणूक

 

शहरात रस्त्यावर किरकोळ कारणावरून मारहाणीच्या घटना वाढत आहेत. यापुढे   ‘स्ट्रीट क्राईम’ आणि वाहनांची तोडफोड करणाऱ्यांना,सार्वजनिक ठिकाणी महिलांची छेडछाड करणाऱ्यांना यापुढे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही (Pune) अमितेश कुमार यांनी दिला.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.